सोमवार, १७ ऑक्टोबर, २०११

Manjrath

मंजरथ हे माजलगाव तालुक्यातील एक गाव आहे ,माजलगाव पासूनचे अंतर १० कि.मी आहे .मंजरथ हे पुरातन गाव असून ,'दक्षिण काशी' या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे.मंजरथ हे सिंधफना व गोदावरी नदीच्या संगमावर वसलेले आहे.


असे म्हणतात कि मंजरथ चा गोदावरी नदीवरील एक घाट अहिल्याबाई होळकर यांनी बांधून दिला आहे.

गोदावरी नदीला गौतम ऋषी नि आणली म्हणून तिला गौतमी हे पण एक नाव आहे.या नदी मध्ये महापातकाला नष्ट करणारी अनेक तीर्थे आहेत त्यामध्ये मुख्य ३ तीर्थे आहेत ,१ त्रीम्बके ( गंगेचे उगमस्थान)२ अब्जके (गंगेचे हृदय स्थान ) ३ गोदासागर संगमे( गोदावरीचे सागर संगम स्थान ) या तिन्ही दुर्मिळ तीर्थात अब्जके चे स्थान विशेष महत्वाचे आहे, हे अब्जक तीर्थ मार्जार क्षेत्र म्हणजेच श्री. क्षेत्र मंजरथ ,ता. माजलगाव जी. बीड (मराठवाडा) येथे आह.
मंजरथ येथे बरेच प्राचीन मंदिरे आहेत .त्यातले एक म्हणजे हनुमंतेश्वर मंदिर


 हनुमंतेश्वर मंदिर ,मंजरथ :- गोदावरी नदीचे सिंधुफेना(सिंदफणा) नदीशी संगम स्थान ते हनुमंतेश्वर मंदिर पर्यंत च्या मधल्या भागाला अब्जक तीर्थ म्हणतात. गोदावरी नदीला गौतम ऋषी नि आणली म्हणून तिला गौतमी हे पण एक नाव आहे.या नदी मध्ये महापातकाला नष्ट करणारी अनेक तीर्थे आहेत त्यामध्ये मुख्य ३ तीर्थे आहेत ,१ त्रीम्बके ( गंगेचे उगमस्थान)२ अब्जके (गंगेचे हृदय स्थान ) ३ गोदासागर संगमे( गोदावरीचे सागर संगम स्थान ) या तिन्ही दुर्मिळ तीर्थात अब्जके चे स्थान विशेष महत्वाचे आहे, हे अब्जक तीर्थ मार्जार क्षेत्र म्हणजेच श्री. क्षेत्र मंजरथ ,ता. माजलगाव जी. बीड (मराठवाडा) येथे आहे.








त्यानंतर अजून एक त्रिविक्रमाचे मंदिर आहे ज्यामुळेच मंजार्थ ला मंजरथ हे नाव पडले आहे .



मंजरथ महात्म्य :- केसरी नावाच्या गंधर्वाला अंजना आणि आद्रिका नावाच्या दोन भार्या होत्या श्रापामुळे अंजना वानरी तर आद्रिका मार्जार (मांजर) झाली.काही काळानंतर आद्रीकेने अब्जक तीर्थात (गोदावरी-सिंदफणा संगम ) स्नान केले असता तिचे मूळ रूप तिला प्राप्त झाले म्हणून हे क्षेत्र मार्जार क्षेत्र म्हणून ओळखले जाते जे पुढे मंजरथ म्हणून ओळखले जाते.
मांजरीच्या नावाने मंजरथ ओळखले जाते ती मांजर भगवान श्री त्रीविक्रमासोबत दिसते .

त्रिविक्रम मंदिर खूपच सुंदर आहे पूर्ण दगडी बांधकाम आहे .




मंजरथ विषयी माहिती मिळवण्यासाठी नांदुरकर गुरुजींचे खूप सहकार्य मिळाले.